32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home महाराष्ट्र आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांवर खटला चालवण्यासाठी राज्यपालांची परवानगी

आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांवर खटला चालवण्यासाठी राज्यपालांची परवानगी

0
23

blank

मुंबई, दि. ४ – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्यास महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १९७ अन्वये अशोक चव्हाणांवर आयपीसीच्या गुन्हेगारी स्वरूपाचा कट आणि फसवणुकीच्या आरोपाखाली खटला दाखल करण्याचा सीबीआयचा मार्ग मोकळा झाला आहे. न्या. पाटील यांच्या चौकशी आयोगातून हाती आलेल्या नव्या अतिरिक्त माहितीच्या आधारे तसेच मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निष्कर्षांच्या आधारेसीबीआयला हा खटला भरायचा आहे. सीबीआयच्या विनंतीवर मत्रीमंडळाशी सल्लामसलत केल्यानंतर राज्यपालांनी ही परवानगी दिली.

blank