शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसने केले रास्ता रोको आंदोलन

0
10

कुरखेडा, दि.४: संपूर्ण कुरखेडा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज काँग्रेस पक्षातर्फे कुरखेडा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, प्रदेश सदस्य हसनअली गिलानी, पंचायत समिती सदस्य प्रभाकर तुलावी, पंचायत समिती सभापती शामीना उईके, माजी उपसभापती नवनाथ धाबेकर, नगर पंचायत उपाध्यक्ष जयश्री धाबेकर, नगर पंचायत सभापती आशा तुलावी आदींच्या नेतृत्वात आज दुपारी साडेबारा वाजता नवीन बसस्थानकाजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले.