भुयारच्या महिलांचा दारुबंदीच्या विरोधात ठिय्या

0
11

 

पवनी,दि.4-भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातंर्गत येत असलेल्या भुयार ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकाने पैसे घेऊन गावात दारु दुकान सुरु करण्याकरीता दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्राच्या विरोधात आज गावातील महिला व पुरुषांनी एकत्रित होऊन ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन सुरु केले.सुमारे पाच लाख रुपयाचा देवाणघेवाण करुन नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप असून एक आठवड्याच्या आत ग्रामसभा घेऊन ठराव रद्द न केल्यास ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.यावेळी गावातील 100 च्यावर महिला व 50 च्या जवळपास पुुरुष सहभागी झाले होते.