34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय अन्न धान्य व दुग्धजन्य पदार्थवरील जीएसटी तातडीने रद्द करावी:-गंगाधर परशुरामकर

अन्न धान्य व दुग्धजन्य पदार्थवरील जीएसटी तातडीने रद्द करावी:-गंगाधर परशुरामकर

0
33

blank

सड़क/अर्जुनी:–पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली असलेल्या भारत सरकारने अन्न धान्य व दुग्धजन्य पदार्थ यावर नुकताच जीएसटी कर लावला आहे.तो तातडीने रद्द करावा अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी देशाच्या अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांचेकडे केली आहे.
देशात अन्न धान्य व दुग्धजन्य पदार्थ यावर जीएसटी लावण्याची निर्मला सितारामन यांनी नुकतीच घोषणा केली आहे. ही घोषणा शेतकरी विरोधी आहे. कारण हा पाच टक्के कर जरी व्यापारी देणार असले तरी याचा फटका शेतकरी बांधवाना बसणार आहे. कारन पाच टक्के कर व्यापारी यांना देणे आहे. हे गृहीत धरून व्यापारी कमी भावात अन्न धान्य व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करतील आणि याचे मोठे नुकसान हे शेतकरी बांधवाना बसणार आहे.आधीच खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यात आणखी ही भर पडली, या करा पासून भारत सरकार आयए सुमारे एक कोटी रुपये कर मिळणार आहे .अन्न धान्याचा जीवनावश्यक वस्तू मध्ये समावेश आहे. या धान्यावर साठा बंदी सारख्या कायद्या चा वापर सरकार कडून नेहमीच करण्यात येतो. त्यात पुन्हा ही भर पडली तर पुन्हा अडचण होणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांचे हिताचा निर्णय घेवून ही जीएसटीचा कर रद्द करावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी देशाच्या अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांचे कडे पत्र पाठवून केली आहे.

blank