
गोरेगाव,दि.21ः- गोंदिया जिल्ह्यासह गोरेगाव तालुक्यात गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे व पडलेल्या घरासंह गोठ्यांचे त्वरीत पंचनामे करुन आर्थिक मदत देण्याच्या मागणीचे निवेदन गोरेगांव तालुका कांग्रेस कमेटीच्या वतीने आज(दि.२१) राष्ट्रपती व मुख्यमंत्री यांच्या नावे तहसिलदारामार्फेत देण्यात आले.सोबतच निवेदनात गोरेगाव नगरपंचायतीच्यावतीने करण्यात आलेल्या निकृष्ठ बांधकामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.निवेदन देतेवेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दिलीप बंसोड,प्रदेश काँग्रेस महासचिव नामदेवराव किरसान,प्रदेश कांग्रेस कमेटी सचिव पी.जी कटरे,तालुका कांग्रेस अध्यक्ष डेमेन्द्र राहागंडाले,काँग्रेस किसान आघाडी जिल्हाध्यक्ष जितेश राणे,जगदीश येरोला,शशीभाऊ भगत,भुमेश्वरी राहागंडाले,आरती चवारे,खीरचंद येळे,डा.केदार पटले,रमेश वट्टी,मदन बघेले,ऊत्तम कटरे,भीमराज टेभुर्निकर,सुरेश चन्ने,खालीद भाई पठान,सादील शेख,मदन कोंटागले,मदन अटरे,कैलाश डोंगरे,दिलराज सिंगाळे,प्रेमलाल भगत,एम.एच.मौजे,देवदास चचाने,मालीक मेळे,रमेश क्षिरसागर,कोमल गीर्हपुंजे,खेमराज भंडारी,छगनलाल सेवुतकर,देवचंद कुभंलकर,डा.चुळामन राहागंडाले,कवळु सोनवाने,देवदास राऊत,सुनिल डोंगरे आदी उपस्थित होते.





