43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय प्रशासनच तिरंगा ध्वजसंहितेपासून अनभिज्

प्रशासनच तिरंगा ध्वजसंहितेपासून अनभिज्

0
31

blank

आमदार सहसराम कोरोटे यांची प्रतिक्रिया
देवरी,ता.०८ : देशात स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन हा अम्रुत महोत्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. मात्र हर घर तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून केन्द्र सरकार काय सिध्द करित आहे हे माहित नाही. या अभियानाच्या मुळात अमलबजावणीच्या दरम्यान या देशाच्या राष्ट्रध्वजाची अवमानना होणार नाही या बाबीचा विचार करण्यात आला नाही. त्यातल्यात्यात गोंदिया जिल्हा प्रशासनाकडून तिरंगा ध्वज विक्रीसाठी पुरविण्यात आलेले सदोष तिरंगा झेंडा म्हणजेच प्रशासन तिरंगा ध्वज संहितेपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया आमगावं-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी प्रसिध्दि पत्रकाद्वारे दिली आहे.
दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात आमदार कोरोटे यांनी म्हटले आहे की, कोणतीही वस्तू कंपनी पासून विक्री केन्द्रापर्यंत पाठवितांना संपूर्ण तपासणी करूनच पाठवीली जाते. परंतू गोंदिया जिल्हाप्रशासना कडून या प्रकारची कोणतीही दखल घेण्यात आली नाही असे दिसून येत आहे.
तिरंगा ध्वजसंहितेनुसार आपला हा तिरंगा राष्ट्रध्वज हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशिनद्वारे तैयार केलेला असावा. यात हा ध्वज सूत,पालिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरी पासून तैयार केलेला हा ध्वज आयताक्रुती असेल तसेच याची निर्मिती ही ३:२ या प्रमाणात असावा आणी तिरंगा ध्वज फडकवितांना नेहमी झेंड्यातील केशरी रंग हा वरच्या बाजूने तर हिरवा रंग हा जमिनीच्या बाजूने राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.यात कशल्याही प्रकारची चूक केल्यास तो तिरंगा ध्वजचा अवमान केल्याचे समझले जाते.
गोंदिया जिल्हा प्रशासनाकडून शासकिय स्वस्त धान्य दुकान आणी स्थानिक स्वराज्य संस्थाना हर घर तिरंगा या अभियानाकरिता तिरंगा ध्वज उपलब्ध करूण देण्यात आले. मात्र उपलब्ध करूण दिलेला तिरंगा ध्वज हाआयातक्रुती ३:२ या प्रमाणात नाही. या ध्वजातील तिन्ही रंगाचे पट्टे हे समप्रमाणात नाही. आणी या मध्ये असलेला अशोक चक्र हा पूर्ण गोल नसून अंडाक्रुती आकाराचा आहे. तसेच या ध्वजाचा कापडही पालिस्टर म्हणून वापरला गेला असला तरी तो दर्जेदार नाही हा कापड राजकिय पक्षाच्या झेंड्यासाठी वापरलेल्या कापडा सारखा आहे.
‌ एकंदरीत आमगांव – देवरी विधानसभा क्षेत्रात विक्रीसाठी उपलब्ध करूण देण्यात आलेला तिरंगा ध्वज हा जवळपास ७० ते ८० टक्के सदोष असल्याचा प्रकार दिसून येतो. जिल्ह्यात पालिस्टर या कापडापासून तिरंगा ध्वज निर्मिती करण्यात आली आहे.मात्र ध्वज संहितेच्या मापदंडाकडे या ध्वजाच्या निर्मिती दरम्यान दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
‌ त्यामुळे या निर्मिती पासून देशाच्या सर्वोच्चपदी असलेल्या राष्ट्रध्वजाची अवमानना होत असेल तर या अभियाना दरम्यान आणी अभियानानंतर तिरंगा या ध्वजाचा सन्मान कसा राखला जाईल याची कल्पना करणेही कठीण होत आहे.
‌ अशी प्रतिक्रीया आमगावं – देवरी क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी प्रसिध्दि पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

blank