
अर्जुनी मोर– मागील काही दिवसापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे धान पिके खरडलित. शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झालेत. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी घराची नुकसान भरपाई झाली त्यांना प्राधान्याने घरकुल मंजूर करावेत उकडलेले रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशा मागणीचे निवेदन अर्जुनी मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उपविभागीय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात मागील आठवड्यात सतत अतिवृष्टी झाली. धान पिके, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले त्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, घराची नुकसान झाली त्यांना प्राधान्याने घरकुल मंजूर करावे ,सर्वत्र रस्ते उघडले त्याची तातडीने दुरुस्ती करावी, शेतकऱ्यांना मिळणारी प्रोत्साहन राशी तात्काळ घ्यावी, पावसाळी धान पिकाला देण्यात येणारी डीबीटीची रक्कम त्वरित घ्यावी व इतर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले.
उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर , किशोर तरोने, भोजराम रहिले, उद्धव मेहंदळे, आर के जांभुळकर, डॉ. दीपक राहिले, अजय शहारे ,शालिक हातझाळे, नानाजी पिंपळकर ,मोरेश्वर रहेले, किशोर ब्राह्मणकर, सागर आरेकर, दिनेश शहारे ,नरेंद्र रंगारी, निप्पल बरया ,तुलाराम गहाणे, गुलाबशहा कोडापे ,सचिन लांजेवार ,सर्वेश धांडे, रवी मलगमे ,मधू नाकाडे ,विजय हतझाडे व इतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.





