
अर्जुनी मोरगाव,दि.16ःस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र पवनी धाबे येथील ध्वजारोहण कार्यक्रमाला जात असताना अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेली झाडे वनविभागाच्या चमुच्या मदतीने मौक्यावर हजर राहून रस्ता मोकळा करून घेतला.
अतिवृष्टीमुळे मौजा कान्होली येथील रमेश रहीले यांच्या पडलेल्या घराची पाहणी करुन तलाठी महोदयांना पंचनामा करून लवकर मदत मिळवून देण्याचे आदेश दिले.त्याचप्रमाणे मौजा रामपुरी येथील शेती पाण्याखाली आल्याने धानपिकाचे नुकसान झाले आहे त्यांचेही पंचनामे करण्याचे निर्देश देऊन लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी जि.प.सदस्य रतिरामजी राणे,माजी सैनिक निताई मंडल,संजय ईश्वर,कलीराम काटेंगे, अविनाश रहिले, संदिप रहिले,जितु कापगते,देवेंद्र बोहरे तथा नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.





