
गोंदिया,दि.16ः- शैक्षणिक व सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल नगर परिषद गोंदियाच्यावतीने( दि.१३)जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते व उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.वेदप्रकाश चौरागडे,नगर परिषद प्रशासकीय अधिकारी चुन्नीलाल राणे,कार्यालय अधिक्षक मनीषा पारधी यांच्या उपस्थितीत न.प.डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथ.शाळा कुंभारेनगर येथील सहायक शिक्षक रविन्द्रकुमार सेवकराम अम्बुले यांचा सामाजिक व शैक्षणिक कार्यात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
स्वांतत्र्य अमृत महोत्सव निमित्त नगर परिषद गोंदियाने अनेक विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणार्या माजी सैनिक,आरोग्य अधिकारी कर्मचारी व इतर विभागातील कर्मचारी यांचा उत्कृष्ठ कार्याबद्दल डॉ.बाबासाहेब आम्बेडकर भवनात कार्यक्रम आयोजित केला होता. यावळी शिव हुकरे,भूपेंद्र शनिवारे तसेंच नगर परिषद् गोंदियातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





