
गडचिरोली, दि.१२: गावाबाहेर शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या युवकास येथील विशेष सत्र न्यायालयाने आज १० वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मिथुन दुर्गाप्रसाद बारसागडे(२२)रा.रेंगेगाव ता.धानोरा असे शिक्षा झालेल्या दोषी युवकाचे नाव आहे.ही घटना आहे २४ मे २०१४ ची. पीडित १४ वर्षीय मुलगी गावाबाहेर शौचास गेली असता आरोपी मिथुन बारसागडे याने झुडुपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता.वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचे बयाण नोंदवून मिथून बारसागडेवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. तत्कालिन उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांनी प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.




