शारीरिक व मानसिक क्षमता वृध्दिंगत करण्यासाठी क्रीडा महोत्सव आवश्यक – वायकर

0
4

नागपूर : दैनंदिन कामकाज करीत असताना कर्मचाऱ्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता चांगली असणे आवश्यक आहे. उत्तम शारीरिक क्षमता असणारा कर्मचारी आपल्या कामाला योग्य न्याय देऊ शकतो, असे मत गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केले.

नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) तर्फे आयोजित महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण कर्मचाऱ्यांचा ‘कला संगम’ ‘कला व क्रीडा महोत्सव 2016’ चे उद्घाटन आज नागपूर विद्यापीठ क्रीडांगणावर श्री. वायकर यांच्या हस्ते झाले. 

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रशांत वैद्य, प्राधिकरण सचिव डॉ. बी. एन. बास्टेवाड, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी तसेच सर्व जिल्ह्यांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संचालन डॉ. बी. एन. बास्टेवाड यांनी तर आभार वृषाली देशपांडे यांनी केले.