
गोंदिया : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश काँग्रेसच्या सुचनेवर आज मंगळवारला नेहरु चौकात आंदोलन केले.यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.केंद्र सरकारने आणलेली अग्निपथ योजना आणि जीवना वश्यक वस्तूवरील लावण्यात आलेले जीएसटी मागे घेण्यात यावे, ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी,पीक कर्जमाफ करावे,बेरोजगारांना रोजगार देण्यात यावे या मागण्या आंदोलनकर्त्यांनी लावून धरल्या.यावेळी प्रामुख्याने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप बनसोड,,प्रदेश सचिव अमर वराडे, प्रदेश सचिव पी जी कटरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदनाताई काळे, प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष उषा मेंढे,चंद्रशेखर ठवरे,राधेलाल पटले,प्रमोद लांजेवार रमेश अंबुले,जितेंद्र कटरे,जितेश राणे,दामोदर नेवारे,पप्पू पटले,अमित भालेराव,राजिव ठकरेले,बाबा बागडे यांनी आपले विचार व्यक्त केले. मोठ्या संख्येने शहरातील नागरिक बंधू भगिनी यांनी सहभाग घेतला होता.





