36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ७५0 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ७५0 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
44

blank

हिंगणघाट-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मिशन विदर्भ सुरू करण्यात आले असून,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे हिंगणघाट येथे संघटनात्मक आढावा दौर्‍या निमित्त आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट शहरात भव्य रॅली काढत कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.
या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते ७५0 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यात आला. हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी रेल्वे मतदार संघातील तरुणाईचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रचंड विश्‍वास आहे. याची अनुभूती आज तरुणांची गर्दी पाहून आली, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. हा तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या आशेने पाहत असून आपण त्यांच्या विश्‍वासाला तडा जाऊ न देता त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. सर्व गटतट विसरून आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. आपण एकत्र आलो तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस हमखास जिंकेल, असा विश्‍वास प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
सरकारशी संघर्ष करायचा असेल तर कार्यकर्त्यांची मोठी फौज आपल्याला लागेल. त्यासाठी सभासद नोंदणी तात्काळ पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने, तरुणांच्या ताकदीने हा भाग आपण पुन्हा राष्ट्रवादीमय करू, असे मार्गदर्शन प्रदेशाध्यक्षांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी आमदार सुरेश देशमुख, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ ताकसाळे, जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी कांग्रेस प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, माजी आमदार राजु तिमांडे, प्रदेश उपाध्यक्ष दिवाकर गमे, सभापती अँड. सुधीर कोठारी, माजी नगरसेवक प्रलय तेलंग ,ज्येष्ठ नेते राजेंद्रबाबू डागा, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती देशमुख, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष हरिष काळे, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष जितेंद्र सेजवल, विधानसभा अध्यक्ष संजय तपासे, तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, सुरेखा देशमुख, शहराध्यक्ष विठ्ठल गुळघाणे, महिला शहराध्यक्ष मृणाल रिठे, समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हिम्मत चतूर, माजी सरपंच प्रशांत घवघवे, जिल्हा सचिव दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, अल्ताफ खान आदी मान्यवर उपस्थित होते.

blank