
चामोर्शी,दि.01:-तालुक्यातील गौरीपुर येथे फुटबॉल स्पर्धेचे शुभारंभ व उद्घाटन खा.अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना खा.अशोक नेते यांनी गौरीपुर येथे ४० वर्षापासून स्पर्धा घेण्यात येत असून ही परंपरा टिकवणे गावावर अवलंबून आहे,असे विचार व्यक्त या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार खा.अशोक नेते व सहकारी यांचे कडून ४०००१/- द्वितीय पुरस्कार डॉ.तामदेव दुधबळे माजी.जि.प.उपाध्यक्ष यांचे कडून २५००१/- व तृतीय पुरस्कार मुजुमदारताई व हदय बाला यांचे कडून १०००१/-रूपये अशाप्रकारे ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन करण्यात येते.
यावेळी खा.अशोक नेते,प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा, स्वप्निल वरघंटे प्रदेश सदस्य, आशिषजी पिपरे नगरसेवक तथा जिल्हा महामंत्री ओबिसी मोर्चा,शिल्पा रॉय जि.प.सदस्या,आशिष मुखर्जी सरपंच, महानंद हलदार उपसरपंच,रमेश अधिकारी सोशल मीडिया संयोजक,रेवनाथजी कुसराम पं.स.सदस्य तथा एस.टी मोर्चा संघटन, तरून गाईन तसेच अनेक गावातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.





