35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय शेतकर्‍यांचा बांधावर काँग्रेसचे मुंडन आंदोलन

शेतकर्‍यांचा बांधावर काँग्रेसचे मुंडन आंदोलन

0
23

blank

>गडचिरोली-जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेली अतवृष्टी तसेच मेडिगट्टासह शेजारच्या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतांना शासनस्तरावरुन आश्‍वासनापलीकडे काहीच न मिळाल्याने जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आज, मंगळवार ६ सप्टेंबर रोजी तालुक्यातील शिवणी येथील शेतकर्‍यांच्या बांधावर मुंडन आंदोलन करून राज्य शासनाचा तीव्र निषेध केला. यादरम्यान कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांच्या थेट शेत बांधावर जाऊन शासन विरोधात घोषणाबाजी केली.
जिल्ह्यातील पुरस्थितीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकर्‍यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट कोसळले. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुरता कर्जाच्या खाईत लोटला गेला. या पुरस्थितीमुळे तसेच आर्थिक संकटामुळे जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांनी आत्महत्यासारखी टोकाचे पाऊल उचलले. असे असतांनाही राज्य सरकार शेतकर्‍यांना प्रत्यक्ष मदत न करता केवळ आश्‍वासनाची खैरात वाटत असल्याचा आरोप करीत जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांना घेऊन तालुक्यातील शिवणी येथील शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन मुंडन आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करीत राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. दरम्यान अनेक शेतकर्‍यांनी प्रत्यक्ष मुंडन करीत आंदोलनात सहभाग नोंदवित शासन विरोधात आक्रोश व्यक्त केला.
सदर आंदोलनादरम्यान कॉंग्रेस प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्‍वजित कोवासे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, हरबाजी मोरे, प्रमोद भगत, कविता भगत, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, वसंत राऊत, ढिवरू मेर्शाम, अब्दुल पंजवाणी, सुभाष धाईत, निशा आयतुलवार जावेद खान, दिलीप भांडेकर आदी कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते.

blank