
गोंदिया,दि.08ः- शासकीय अधिकार्यांचे काम हे केवळ प्रशासनाचेच भाग नसून त्यांना वेळप्रसगी सामाजिक बांधलिकीचे सुुध्दा भान ठेवावे लागते.असे अधिकारी प्रशासनात मोजकेच पहायला मिळतात.गोंदिया जिल्ह्यात सामाजिक बांधिलकी जोपसण्याचे काम गेल्या कोवीड काळापासून अप्पर जिल्हाधिकारी राजेश खेवले यांच्या पुढाकाराने सातत्याने राबवण्यात येत आहे.त्या कळीमध्येच आमगाव तालुका मुख्यालयाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौेबे हे अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासोबत शासकीय कामानिमित्त गेलो होते. दरम्यान आमगाव येथे शासकीय दौर्यावर असताना त्यांना गणपती मंडळांने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला भेट दिली. यावेळी मंडळाच्या पदाधिकार्यांनी ते राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. यात जिप शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करीत असल्याचे सांगितले. तसेच शाळेत शिकणार्या अनेक गरीब विद्यार्थ्यांकडे पायात घालण्यासाठी साधी चप्पल देखील नसल्याचे शाळेला भेट दिली असता निदर्शनास आले.तेव्हा चौबे यांनी सामाजिक बांधिलकीचे भाग ठेवून तातडीने अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्याशी चर्चा करीत काही अधिकारी मित्रांच्या सहकार्याने गावातील व्यावसायीकाकडून बुट घेतले व विद्यार्थ्यांना भेट दिले. नवीन बुट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरील आनंद बघण्यासारखा होता.जिप शाळेत गरीब व गरजू कुटूंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र घरच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शैक्षणिक साहित्यही खरेदी करता येत नाही.त्याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होतो.त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचार्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या उत्पन्नातील छोटा हिस्सा अशा विद्यार्थ्यांसाठी खर्च केल्यास या विद्यार्थ्यांचे आयुष्य निश्चित सुकर होऊ शकते.