33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ श्रीराम पुस्तोडे यांची तंमुस अध्यक्षपदी निवड

श्रीराम पुस्तोडे यांची तंमुस अध्यक्षपदी निवड

0
27

blank

सडक अर्जुनी:: तालुक्यातील गिरोला येथील ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच आमसभा सरपंच सुरेखाताई धुर्वे यांचे अध्यक्षतेत घेण्यात आली.या आमसभेमध्ये तंटामुक्ती समिती अध्यक्षाची निवड निवडणूक घेऊन निवड करण्यात आली.माजी सरपंच तथा तंमुस अध्यक्ष श्रीराम कवडू पुस्तोडे व हिवराज बकाराम कापसे या दोघांनी तंमुस अध्यक्ष पदासाठी नामांकन केले.आमसभेत गावातील १७२ ग्रामवासी उपस्थित होते यांनी मतदान केले.हिवराज बकाराम कापसे यांना ५५मते तर श्रीराम कवडू पुस्तोडे यांना ९९ मते मिळाली.या निवडणुकीत श्रीराम पुस्तोडे बहुमताने तंटामुक्ती समिती अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले.
यावेळी ग्रा.प.चे सर्व पदाधिकारी तसेच निमंत्रक संजय दुधपचारे पो.पा., ग्रामसेवक राठोड व समस्त गावकरी उपस्थित होते.तंमुसच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी तंमुस अध्यक्षाचे अभिनंदन केले.याप्रसंगी नवनिर्वाचित तंमुस अध्यक्ष श्रीराम पुस्तोडे यांनी निवडणूक प्रक्रियानुसार माझी निवड झाली असली तरी निःपक्षपणे सर्व गावकऱ्यांना न्याय देणार अशी ग्वाही दिली.

blank