मोक्षगुंडम विश्वसरैया यांचे अंगीकृत गुण आत्मसात करा: जि.प.उपाध्यक्ष इंजि यशवंत गणविर

0
32

गोंदिया,दि.१५ः-देशाच्या जड़णघडण क्षेत्रातच नव्हे तर बांधकाम कौशल्यात आपले नाव कोरणारे भारतरत्न मोक्षगुंड्म विश्वसरैय्या यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हापरिषद येथे अभियंता दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी बोलताना जि.प.उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणविर म्हणाले की,देशाच्या विकासासाठी अभियंता हा तारणहार म्हणून काम करत असतो.देशाच्या विकासात सर्वात मोठा सिंहांचा वाटा हा अभियंत्याचा असतो अभियंता हा आपल्या बौद्धिक क्षमतेचा वापर करून विकासाचा आराखडा तयार करतो, म्हणुन एम.विश्वसरैया यांनी केलेल्या कार्याचा अभ्यास करून त्याचे अंगीकृत गुण आत्मसात करण्याचे आवाहन केले.तसेच याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाला लघुसिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता इंजि.वासुदेव रामटेककर,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता इंजि.संजय कटरे,लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता इंजि.गोवर्धन बिसेन,इंजि.अजय सेंगर,इंजि.महेश अग्रवाल,इंजि.अविनाश जयसिंघानी,शैलेश बैस यांच्यासह जि.प.गोंदियाचे कर्मचारी उपस्थित होते.