35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अमरावती राज्य अधिवेशनात जिल्ह्यातील १५ प्रतिनिधीची उपस्थिती

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अमरावती राज्य अधिवेशनात जिल्ह्यातील १५ प्रतिनिधीची उपस्थिती

0
28

blank

:”४ सदस्यांचा राज्य परिषदेत समावेश ”
गोंदिया,दि.22- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे २४ वे राज्य अधिवेशन १८ ते२० सप्टेंबर पर्यंत अमरावती येथे पार पडले.  यात गोंदिया जिल्ह्यातील १५ प्रतिनिधीसह राज्याच्या सर्व जिल्ह्यातुन ४२३ प्रतिनिधी सहभागी झाले होते. अधिवेशनाची सुरूवात मिरवणुकीने होऊन राज्य सचिव काॅ. तुकाराम भस्मे यांचे अध्यक्षतेत जाहिर सभेने करण्यात आली. यात पक्षाचे राष्ट्रीय सचिव काॅ.अमरजित कौर व काॅ.डाॅ.भालचंद्र कांगो यांनी मार्गदर्शन केले.या अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्राच्या अखेरच्या सत्रात ७१ सदस्यीय राज्य परिषदेची सर्व सम्मतीने निवड़ झाली. यात काॅ. एड.सुभाष लांडे पाटील (अहमदनगर)सचिव तथा राज्य कार्यकारिणी मध्ये गोंदिया जिल्ह्यातुन काॅ.हौसलाल रहांगडाले,कंट्रोल कमिशन सदस्य काॅ.करूना गनवीर तथा राज्य परिषद सदस्यात काॅ.मिलिंद गनविर व काॅ.रामचंद्र पाटिल यांचा समावेश आहे. काॅ.डाॅ.राम बाहेती,प्रा. तानाजी ठोंबरे ,काॅ.मिलिंद गनविर, काॅ.स्मिता पानसरे तथा काॅ.क्रांती देशमुख यांचे अध्यक्ष मंडळात संपन्न प्रतिनिधि सत्रात काॅ.तुकाराम भस्मेनीं राजकिय व काॅ.सुभाष लांडे पाटील यांनी संघटनात्मक अहवाल प्रस्तुत केले.प्रतिनिधींच्या विस्तृत चर्चेत नंतर पारित केले गेले. या अधिवेशनाने १४ ते १८ आक्टोबर २२ पर्यंत विजयवाड़ा(आंध्रप्रदेश)येथे होणा-या पक्षाच्या २४ वें महाधिवेशन (पार्टी कांग्रेस) करिता काॅ हौसलाल रहांगडाले सह २१ सदस्यीय प्रतिनिधिमंडळाची निवड़ करण्यात आली.अधिवेशनात विविध विषयांवर पर अनेक प्रस्ताव पारित करण्यात आले.

blank