
गोंदिया,दि.27ः– गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव जितेश लेखनलाल टेंभरे यांनी 26 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह जिल्हा महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे.टेंभेर यांनी आपला राजीनामा पक्षाचे जिल्हाध्यक्ष गंगाधऱ परशुरामकर यांना पाठवले असून टेंभरे यांच्या राजीनाम्यामुळे गोंदिया ग्रामीणमध्ये येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जितेश टेंभरे यांचे सहकार क्षेत्रात सुध्दा काम आहे.टेंभरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकले असले तरी सद्या कुठल्या पक्षात प्रवेश करण्याचा विचार नसल्याचेही त्यानी म्हटले आहे.





