दसर्‍याला रावण दहन प्रथा बंद करा

0
22

जिवती- महात्मा राजा रावण अत्यंत समृद्ध संस्कृतीचा वैभवशाली वारसांचा देदीप्यमान अस्मरणीय ठेवा आहे. राजा रावण विविध गुणांचा समुच्चय आहे महान दर्शनी, संगीत आयुर्वेदाचार्य, उत्कृष्ट रचनाकारतज्ज्ञ, राजनितीतज्ञ, शिल्पकार, समताधिष्ट समाज व्यवस्थेचा उद्घाता, न्यायप्रिय राजा असा अनेक गुणांचा आविष्कार करणारा महात्मा राजा होता. अशा रावणाबद्दल काही षडयंत्रकारी व्यवस्थेने बदनाम करण्याचा कोणताही कसूर ठेवलेला नाही.वास्तविक राजा रावणासारखा महापराक्रम योद्धा झाला नाही यापुढेही होणार नाही.
तामिळनाडूमध्ये रावणाची २५२ मंदिरे आहेत. सर्वात मोठे मंदिर व मूर्ती मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंची इतकी मूर्ती आहे. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात मेळघाट छत्तीसगड मध्यप्रदेश, झारखंड येथे राजा रावणाची पूजा केली जाते. रावण हे आदिम जमातीचे र्शद्धास्थान व दैवत आहे. मूळनिवासी आदिवासी समाज महात्मा राजा रावण यांना दैवत राजा मानतो, परंतु आदिवासींचा समताधिष्टीत समाज व्यवस्थेचा उद्घाता असलेल्या न्यायप्रिय राजा रावणाला जाळण्याचे प्रथा व परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात म्हणून राजा रावण दहन करण्याची परवानगी देऊ नये व हे प्रथा बंद करण्यात यावी, याबाबत निवेदन पोलिस अधीक्षक सचिन जगताप ठाणेदार यांना देण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रा.लक्ष्मण मंगाम, संघटक केशव कुंमरे, संजू मडावी, मोहन आत्राम आदिवासी विद्यार्थी संघ कोषाध्यक्ष राजकुमार मंगाम, हनुमंत कुमरे देवाजी कोहचाडे उपस्थित होते. दसर्‍याच्या दिवशी रावण दहन करण्याचा प्रयत्न केला तर सर्व आदिवासी संघटना कडून तीव्र जाहीर निषेध व्यक्त करण्यात येईल. याविरोधात जो कोणी त्यांचे सर्मथन करतील आमच्या भावना दुखावतील आमच्या न्याय राजाचा अपमान करतील, अशा लोकांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता ८६0 अंतर्गत १५३, १३४, १३५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावी अशी निवेदनातून मागणी केली आहे.