
गोंदिया,दि.20 शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2022-23 मधील धान खरेदी करिता एन ई एम एल पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करिता 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व धान उत्पादन शेतकऱ्यांनी तालुक्यातील नजीकच्या आधारभूत धाना खरेदी केंद्रावर स्वत:चे प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. व्ही. बाजपेयी यांनी केली आहे.
चालु हंगामाचे 7/12 उतारा, अधाराकार्ड, बँक पासबुक व मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे सादर करून 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत खरीप हंगामातील धान खरेदी करिता ऑनलाईन नोंदी पूर्ण करून घ्यावी व शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. तसेच कोणत्याही शेतकऱ्यांनी जनधन योजनेचे खाते, संयुक्त बँक खाते नोंदणी करताना देवु नये असे आवाहनही त्यांनी केले.