40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय पीडीपीबरोबर सत्ता स्थापणा-या भाजपानं देशभक्तीची प्रमाणपत्र वाटू नये – राज ठाकरे

पीडीपीबरोबर सत्ता स्थापणा-या भाजपानं देशभक्तीची प्रमाणपत्र वाटू नये – राज ठाकरे

0
27

blank

पुणे, दि. २७ – जेएनएयू प्रकरणात भाजपा राजकारण आणत आहे, देशभक्तीची प्रमाणपत्रं भाजपानं वाटू नये असं सांगत, अफझल गुरूसंदर्भात ठराव मांडणा-या पीडीपीसोबत भाजपानं सरकार स्थापन केलं आहे याची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली आहे.देशविरोधी घोषणा कोणी देत असेल तर त्याला तिथं जागच्या जागी फोडायला हवं असं राज ठाकरे म्हणाले. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अभाविपला जेएनयूमध्ये स्थिरस्थावर करण्यासाठी हे केलं जातंय का असं वाटावं अशी स्थिती असल्याचं राज ठाकरे म्हणाले. अशा मुद्यांमध्ये राजकारण आणू नये आणि जे कोणी देशविरोधी घोषणा देतील त्यांना तिथल्या तिथं फोडावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

blank