मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसेने केला सत्कार

0
7
गोंदिया,दि.२७-महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया शहर व तालुका शाखेच्यावतीने जागतिक मराठी भाषा दिवस स्थानिक विश्राम गृहात साजरा करण्यात आला. या निमित जनतेला नियमित पाऊस असो की उन्हाळा त्याची तमा न बाळगता सेवा देणारे मराठमोळे पोस्टमन रावते, हरीकुंबरे, येडपाते, गायधने, शेंडे, मेश्राम यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन करून आपले विचार व्यक्त केले. उन असो, पाउस असो, किंवा थंडी आपल्याघरी पत्र पोचतेच आणि अशी सेवा देणाऱ्यांचा सत्कार आमच्या हातून घडला हे आमच भाग्य असल्याचे ते म्हणाले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर या वेळी उपस्थित होत्या. मुकेश मिश्रा,मिलन रामटेककर, सुरेश ठाकरे, उदय पोफळी, राजेश नागोसे, उदय काळे, आनंद राहुलकर, देवीलाल रावते, यशवंत ठाकरे, मंगेश मरसकोल्हे, दिलीप कोसरे, प्रभुदास आगाशे, पियुष लांजेवार, भिमोदय वैद्य,खेमराज ठाकरे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.संचालन उदय पोफळी यांनी केले आभार सुरेश ठाकरे यांनी मानले.
,