
भंडारा-जिल्हाधिकारी संदीप कदम यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी शनिवारी समाप्त झाल्याने त्यांचे स्थानांतर करण्याचे आदेश शासनाच्या निर्देशावरुन विभागीय आयुक्तांनी दिले. जिल्हाधिकार्यांचा प्रभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांच्याकडे देण्यात आला. जिल्हाधिकारी संदीप कदम मूळे हिमाचल प्रदेश कॅ डरचे अधिकारी आहेत. ते महाराष्ट्र कॅ डरचेमध्ये प्रतिनियुक्तीवर होते. ऑगस्ट २0२0 मध्ये त्यांनी भंडारा जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली होती.
आपत्ती व्यवस्थापनात त्यांनी जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य केले असून कोरोना संकाळात त्यांनी केलेल्या कार्याची राज्य शासनाने दखल घेतली होती. भंडारा शहरातील पूरपरिस्थिती हाताळण्यात त्यांनी यश मिळविले आपल्या कार्यकाळात त्यांनी लोकोपयोगी विविध उपक्रम राबविले.