33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ अनधिकृत लेआऊटसाठी चौकशी समिती गठीत,पहिली सभा 15 नोव्हेंबरला

अनधिकृत लेआऊटसाठी चौकशी समिती गठीत,पहिली सभा 15 नोव्हेंबरला

0
35

गोंदिया दि. 07राज्याचे महसूल, पशूसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गोंदिया जिल्हा दौरा वेळी गोंदिया शहरातील व क्षेत्रातील लेआऊटमधील जागा खाजगी व्यक्तीनी बळकावणे, नगर परिषदेच्या जागेवर खाजगी व्यक्तीनी कब्जा करणे. शासकीय जमिनीचे अभिलेख खाजगी व्यक्तीचे नांवे तयार करणे व परस्पर विक्री करणे अशा स्वरूपाच्या तक्रारी विविध लोकप्रतिनिधीव्दारा करण्यात आल्या होत्या. या तक्रारीचा संदर्भ विचारात घेऊन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली आहे.

चौकशी समिती खालील प्रमाणे आहे. अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी, गोंदिया, सदस्य म्हणून जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख, गोंदिया, मुख्याधिकारी, नगर परिषद, सडक अर्जूनी सहाय्यक संचालक नगर रचना, गोंदिया यांचा समावेश करण्यात आला आहे.

          चौकशी समितीची पहिली सभा 15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी  11.00 वाजता जिल्हाधिकारी, कार्यालयातील सभागृह (DPC हॉल) येथे होणार आहे. करिता याअनुषंगाने सर्व सामान्य नागरीक, जनप्रतिनिधी यांच्याकडे काही माहिती असल्यास किंवा याबाबत त्यांच्या तक्रारी असल्यास, त्यांनी त्याबाबतचे निवेदने समितीपुढे द्यावी. असे आवाहन समितीचे अध्यक्ष राजेश खवले यांनी केले आहे.

blank