
वृत्तसंस्था
लॉस एन्जल्स – 88 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला पुरस्कार प्रदान करण्याचा मान मिळाला. अमेरिकेतील प्रसिद्घ पीपल्स चॉईस ऍवॉर्डवर अभिनेत्री प्रियांका चोप्राने मोहर उमटवत भारताचे नाव उज्ज्वल केले होते.
हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये चालू असलेल्या 88th ऑस्कर सेरेमनीमध्ये ब्री लार्सनला ‘रूम’ सिनेमासाठी बेस्ट अॅक्ट्रेस अवॉर्ड मिळाला.
-लिओनार्डो डिकॅप्रियो स्टारर ‘द रेवेनेंट’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे.
– लेडी गागाने ‘टिल इट हॅपन्स’ डॉक्युमेंट्रीवर परफॉर्मन्स दिला. तिच्या परफॉर्मन्सची घोषणा यूएसचे व्हाइस प्रेसिडेंट जॉय बिडेन यांनी केली.
– या सेरेमनीमध्ये भारतीय वंशाचे दिग्दर्शक आसिफ कपाडिया यांना ‘एमी’साठी सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री अवॉर्ड मिळाला आहे. हा अवॉर्ड ‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम देव पटेलने प्रेजेंट केला.
– ‘मॅड मॅक्स- फ्यूरी रोड’ सिनेमाला आतापर्यंत 6 ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.
त्यानंतर पुन्हा एकदा भारताच्या शिरपेचात तिने मानाचा तुरा खोवला आहे. हॉलीवूडमध्ये मानाचा समजल्या जाणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात यंदाच्या पुरस्कार प्रदान करणाऱ्यांत तिचे नाव झळकले. जगभरातील चित्रपट रसिक आणि समीक्षकांमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्याबाबत उत्सुकता असते. अमेरिकन टीव्ही मालिका “क्वॉन्टिको‘तील भूमिकेमुळे प्रियांकाने आधीच हॉलीवूडमध्ये आपली छाप पाडली आहे. त्यासाठी तिला पीपल्स चॉईस ऍवॉर्ड देऊन गौरवण्यात आले आहे.
पुरस्कारांची यादी खालिलप्रमाणे…
| अवॉर्ड | कुणाला मिळाला | सिनेमाचे नाव | प्रेजेंटर |
| बेस्ट ओरिजिनल स्क्रिनप्ले | टॉम मॅकेर्थी आणि जोश सिंगर | स्पॉटलाइट | चार्लीज थेरोन |
| बेस्ट अडॉप्टेड स्क्रिनप्ले | चार्ल्स रॅन्डोल्फ एडम मॅके | द बिग शॉर्ट | रसेल क्राऊन |
| बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस | एलिसिया विकान्दर | द डेनिश गर्ल | जे के सिमोंस |
| बेस्ट कॉस्टयूम डिजाइनर | जेनी बीवान | मॅड मॅक्स- फ्यूरी रोड | कॅट विंसलेट |
| बेस्ट प्रॉडक्शन डिजाइन | मॅड मॅक्स-फ्यूरी रोड | टीना फे आणि स्टीव्ह सैरेल | |
| मेकअप अँड हेअरस्टायलिंग | मॅड मॅक्स-फ्यूरी रोड | ||
| बेस्ट सिनेमॅटोग्राफी | रसेल मॅक एडम्स | द रेवेनेंट | इमॅन्युल लुबेज्की |
| बेस्ट एडिटींग | मार्गरेट सिक्सल | मॅड मॅक्स-फ्यूरी रोड | प्रियांका चोप्रा आणि लीव्ह स्क्रिबर |
| बेस्ट साऊंड मिक्सिंग | मॅड मॅक्स-फ्यूरी रोड | ||
| बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स | एक्स मॅचिना | मॅड मॅक्स-फ्यूरी रोड | |
| बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म | बेयर स्टोरी | ||
| बेस्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म | इनसाइड आऊट | ||
| बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर | मार्क रिलेन्स | ब्रिज ऑफ स्पाईज | पेट्रिसिया अरक्वॅट |
| बेस्ट डॉक्युमेंट्री (फिचर) | आसिफ कपाडिया | एमी | देव पटेल |
| बेस्ट डॉक्युमेंट्री (शॉर्ट फिल्म) | अ गर्ल इन द रिवर : द प्राइस ऑफ फॉरगिवनेस | ||
| लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म | स्ट्युटरर |





