प्राप्तीकर मर्यादेत कोणताही बदल नाही- जेटली

0
13

 वृत्तसंस्था

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (सोमवार) अर्थसंकल्प संसदेत सादर करताना करदात्यांसाठी नऊ कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. प्राप्तिकर मर्यादेत कोणताही बदल केला नसून, लहान करदात्यांकडे विशेष लक्ष दिले आहे. 5 लाखांपर्यंत कमाई असलेल्या नोकरदारांना आयकरामध्ये 3 हजारांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळणार आहे.

 प्रथमच घर खरेदी करत असलेल्यांना 35 लाख रुपयांच्या गृहकर्जावर, घराची किंमत 50 लाख रुपयांपर्यंत असल्यास 50 हजार रुपयांची करवजावट मिळणार.
– वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्यांच्या इन्कम टॅक्सवरील अधिभार 12 टक्क्यांवरून वाढवून 15 टक्के.
– करपात्र उत्पन्नाच्या मर्यादांमध्ये म्हणजेच टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही.
– वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या करदात्यांना दर वर्षाला 3000 रुपयांची कलसवलत. सध्याच्या 2000 रुपयांवरून वाढून ही वजावट 5000 रुपये. याचा फायदा एक कोटी करदात्यांना होणार.
– भाड्याच्या घरात राहत असलेल्यांना भाड्यापोटी मिळणारी वजावट 20 हजार रुपयांवरून वाढवून 60 हजार रुपये करण्यात आली आहे.
  • करदात्यांसाठी नऊ कलमी कार्यक्रमाची घोषणा.
  • कर्मचारी भविष्य निधी अंतर्गत नव्याने येणाऱया कर्मचाऱयांसाठी पहिली तीन वर्ष सरकारचे योगदान 8.33 टक्के राहणार.