
गोंदिया,दि.16ः जिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्गत येणाऱ्या लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या पुनर्गठनकरिता 15 नोव्हेंबरला महासंघ कार्यालयांत मावळते अध्यक्ष सुभाष खत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत संघटनेचे पुनर्गठण करण्यात आले.यात सर्वानुमते अध्यक्षपदी संतोष तोमर यांची निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्ष लिलाधर तिबुडे, कार्याध्यक्ष कावळे, सरचिटणीस सौरभ अग्रवाल, कोषाध्यक्ष मनोज मानकर तर प्रसिद्धी प्रमूख म्हणून गितेश तिजारे यांची निवड करण्यात आली.
संतोष तोमर व सौरभ अग्रवाल यांनी पदभार सांभाळताच जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत सर्व लिपिक वर्गीय कर्मचारी यांच्या न्याय मागण्या जिल्हा प्रशासन व राज्य शासनाच्या स्तरावर पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.या निवडीबद्दल महासंघाचे अध्यक्ष पी.जी.शहारे,शैलेश बैस,सुभाष खत्री,संतोष तूरकर,यशवंत माणापुरे, कु. चित्रा ठेंगडी,तेजस्विनी चेटूले आदींनी अभिनंदन केले.