घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरांना पाच वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा

0
37

गोंदिया,दि.18ः- गोंदिया शहर पोलीस ठाणेंतर्गत घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरांना गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.17 नोव्हेबंरला गोंदियाचे मुख्य जिल्हा न्यायधिश यांनी शहरांमध्ये घरफोडी करणाऱ्या राहुल लिलेश्वर पाल उर्फ इमरान सलीम शेख (26 वर्षे रा.गौतमनगर गोंदिया) व त्याचा साथीदार अनुज जगदीश चौधरी यांच्याविरुध्दच्या सबळपुुराव्यामुळे कारावासाची शिक्षा ठोठावली.सविस्तर असे की गेल्या वर्षी गोंदिया शहरात पाच वेगेगळ्या ठिकाणी घरफोडी करून एलईडी टीव्ही व घर उपयोगी साहित्य चोरी गेले होते.त्याविरुद्ध पो. स्टे. गोंदिया शहर येथे 2021 मध्ये चोरी घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात येवून तपासाअंती त्यांचे विरुद्ध न्यायालयात फौजदारी खटला अनु. क्र. 475, क्र. 320, क्र 343, क्र. 353, क्र.445 प्रमाणे वेगवेगळे खटले चालविण्यात आले.यामध्ये दोन्हीं आरोपीना प्रत्येक गुन्हाकरीता पाच वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा, तसेच दंड न भरल्यास प्रत्येकी 3 महिने शिक्षा सुनावली आहे.यातील आरोपी राहुल लीलेश्वर पाल उर्फ इमरान सलीम शेख रा. गौतम नगर गोंदिया याचेवर गोंदियासह नागपूर व दुर्ग येथेही घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.वरील गुन्ह्याचे तपासी अधिकारी म्हणून गोंदिया शहर पो. स्टे. येथील पो. हवा. उईके/1120, पो. हवा. मेश्राम/558, पो.हवा. सुबोध बिसेन/ 1402, पो. हवा. शेंडे/330, पो.ना. रहांगडाले/318 यांनी गुन्ह्याचे तपासाचे काम केले. तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार जामकाटे यांनी काम पाहिले.पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने, पो.स्टे.गोंदिया शहर पो.नि.चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उत्कृष्ट तपास करणारे सर्व तपासणी अंमलदार यांचे त्यांनीं केलेल्या कौतुकास्पद कामगिरी करिता अभिनंदन केले.