सपोनी पाटीलच्या चमूने केली घरफोड्या करणाऱ्या 3 गुन्हेगारांना अटक

0
37

गोंदिया,दि.18ः- गोंदिया शहर पोलीस ठाणेंतर्गत घरफोडी करणार्या चोरांच्या टोळीचा गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सागर पाटील यांच्या चमूने पर्दापाश करुन या घरफोडीतील सराईत 3 गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने किंमती 1 लाख 83 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेले फिर्यादी सुमित अशोक उईके, रा.आरपीएफ. कॉर्टर, मेन पोस्ट ऑफीस जवळ, गोंदिया, हे दिनांक ०५ ते ०७/१०/२०२२ पर्यंत बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करुन लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या – चांदीचे दागिने किंमती २,०२०००/- रुपयाचे चोरून नेल्याची घटना घडली होती.या घटनेची तक्रार फिर्यादीने शहर पोलीस स्टेशन येथे नोंदवली.त्या दाखल तक्रारीच्या आधारे अपराध क्रं. ६३९ / २०२२, कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.त्यातच जिल्ह्यातील सर्व पोलीस निरिक्षकांच्या बैठकीत पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी चोऱ्या -घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून, गुन्हेगारांना अटक करुन तात्काळ गुन्हा उघड करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार शहर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु करीत मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी सोनु गोपाल चव्हाण वय ३८,रा. गौशाला वार्ड, गोंदिया,राजेश भरत गायकवाड वय ४०,रा. सेंदुरवाफा,जि. भंडारा व  मनिष ऊर्फ बुच्ची मन्नु कुलदिप वय २३, रा. दसखोली, गोंदिया यांना ताब्यात घेत तपास सुरु केला असता या तिघांनिही आपण गुन्हा केल्याची कबुली दिली.तसेच त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोने- चांदीचे दागिने 1 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी मिळाली असून अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर ,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने,पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी मार्गदर्शनात तपास स.पो.नि. सागर पाटील हे करीत आहेत. सदर कारवाई शहरचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि.सागर पाटील, यांचे नेतृत्वात पो. हवा. जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, मपोहवा. रिना चौव्हाण, अरविंद चौधरी, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, ओमेश्वर मेश्राम, सुबोध बिसेन, पोना दिपक रहांगडाले, पोशि विकास वेदक, पुरुषोत्तम देशमुख, दिनेश बिसेन, मुकेश रावते, कुणाल बारेवार यांनी कामगीरी केली आहे.