40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ आमदार आदर्श ग्राम डव्वाचा सर्वांगीण विकास होणार -जैन

आमदार आदर्श ग्राम डव्वाचा सर्वांगीण विकास होणार -जैन

0
20

blank

सडक अर्जुनी,दि.02- : विधानपरिषदेचे आमदार राजेंद्र जैन यांनी आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावाची निवड करुन आज बुधवारला पहिल्या ग्रामसभेला उपस्थित राहून गावविकासाची भूमिका सादर  केली. गावाच्या विकासाची योजना तयार करण्यासाठी नागरिकांनीच उपाय सुचवावे असे त्यांनी यावेळी आवाहन केले.नागरिक ज्या योजनांची मागणी करतील तसेच ग्रामपंचायतीला जे हवे असले त्या पध्दतीनेच काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी बकुल,घाटे,गटविकास अधिकारी टेंभरे,तहसिलदार बराडीकर,जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर,सरपंच शारदा किरसान,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अविनाश काशीवार,देवेंद्रनाथ चौबे यांच्यासह ग्रामपंयातचे पदाधिकारी आणि इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

blank