फिरत्या लोक अदालत वाहनाला न्या.गिरटकरांनी दाखवली झेंडी

0
8

गोंदिया,दि.02- गोंदिया जिल्हा विधी सेवा आणि जिल्हा सत्र न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील लोकांमध्ये कायदे विषयक जनजागृती व्हावी आणि प्रलंबित प्रकरणे मार्गी लागावी यासाठी  फिरत्या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. १ मार्च ते ३१ मार्च दरम्यान दरवर्षी फिरत्या लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी जिल्यातील आठ तालुक्यातील ३१ गावांमध्ये हे फिरते लोक अदालातीचे वाहन जाणार आहे. जिल्हा न्यायालय परिसरात मंगळवारला फिरत्या लोक अदालतीच्या वाहनाला जिल्हा सत्र न्यायाधीश गिरटकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.या फिरत्या लोक अदालतीचे कामकाज सेवानिवृत्त न्यायाधीश सी. पी. चौधरी हे पाहणार आहेत.प्रलंबित प्रकरणे मार्गी काढण्यासाठी एक सरकारी वकील, एक सामजिक कार्यकर्ते तसेच  विधी महाविलयाचे प्राध्यापकाच्या माध्यमातून या फिरत्या लोक अदालतीचे काम चालणार आहे. यावेळी सेवानिृत्त न्यायाधिश सी.पी.चौधरी,सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांच्यासह इतर उपस्थित होते.