३ सुळे दात, १५ नखे व इतर भागाचे हाड व मोटारसायकल जप्त
* वन पथकाची कारवाई
भंडारा :- वाघाचे ३ सुळे दात, १५ वाघ नखे व इतर अवयवांची विक्री करतांना वन विभागाच्या पथकांनी दोघांना रंगेहाथ अटक केली.
सविस्तर असे की, दि. १९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता च्या दरम्यान दक्षता विभाग, वनविभाग नागपुर, फिरते पथक भंडारा तसेच वनक्षेत्र नाकाडोंगरी येथील वनकर्मचारी, वनाधिकारी यांनी संयुक्तरित्या खबरी मार्फत मिळालेल्या वाघाच्या अवयवांची तस्करी करण्याऱ्या रामु जयराम उईके रा. पवनारखारी, ता.तुमसर, जि. भंडारा व संजय श्रीराम पुष्पतोडे रा. चिखला, ता. तुमसर, जि. भंडारा यांना बनावट ग्राहक बनून सापळा रचुन वन्यजीव संरक्षण अधिनियमच्या अनुसूची 1 मधिल वन्यप्राणी वाघाच्या शरीर अवयवांसह रंगेहात विक्री करीत असतांना पकडण्यात आले. आरोपींकडून 3 सुळे दात, 15 वाघ नखे व इतर शरीराचे हाडांचे अवशेष व मोटारसायकल जप्त करण्यात आले असुन या वन्यजीव अपराध प्रकरणात वरील दोन्ही आरोपींना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या वनअपराध प्रकरणात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वन्यजीव अपराधाची नोंद करण्यात आली आहे.
सदर कामगिरी प्रितमसिंग कोडापे विभागीय वन अधिकारी दक्षता, नरेंन्द्र चांदेवार, सहाय्यक वनसंरक्षक उमरेड, साकेत शेंडे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी, गडेगाव आगार वनविभाग भंडारा, संदीप गिरी, सहाय्यक वनसंरक्षक नागपुर, संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक भंडारा, वनपरिक्षेत्र अधिकारी नाकाडोंगरी सि.जी. रहांगडाले, पि.एम.वाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी, एन.डि.तवले, जि.जि. जाधव, वाय.डी. ताडाम, व्ही. एस.शेंडे, डि.के. पडवाल सर्व वनरक्षक बुटीबोरी व प्रफुल्ल खोब्रागडे वनरक्षक फिरते पथक भंडारा तसेच वनक्षेत्र नाकाडोंगरी येथील वनाधिकारी व वनकर्मचारी यांनी संयुक्तरित्या केली.