शिक्षकांसाठी सर्वात मोठी बातमी ! सरकारने केली मानधनात ‘इतकी’ वाढ

0
38

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा विचार केला तर अनेक प्रकारच्या मागण्या या वर्षानुवर्षीय कर्मचाऱ्यांच्या असतात. त्यातील बऱ्याच मागण्या अजून देखील पूर्ण झालेल्या नसून त्या बाबतीत सातत्याने पाठपुरावा करण्यात येतो. याबाबतीत जर आपण शिक्षकांचा विचार केला तर शिक्षकांच्या बाबतीत देखील अनेक प्रकारच्या समस्या या बऱ्याच वर्षापासून आहे त्याच स्थितीत आहेत.

यातीलच एक प्रमुख समस्या म्हणजे जे काही खाजगी मान्यताप्राप्त शाळांमधील घड्याळी तासिका तत्त्वावर नेमलेल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे आता राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त शाळांमधील घड्याळी तासिकावर नेमलेल्या शिक्षकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. याबद्दलचा महत्त्वपूर्ण निर्णय काय आहे याबद्दलची माहिती घेऊ.

काय होती या शिक्षकांच्या मानधनाची आतापर्यंतची स्थिती?
या प्रश्नावर शिक्षकांच्या माध्यमातून बऱ्याच प्रकारचे आंदोलन देखील करण्यात आलेले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून या शिक्षकांचे मागणी होती की त्यांना देण्यात आलेल्या मानधनांमध्ये वाढ करण्यात यावी. जर आपण यामागची पार्श्वभूमी पाहिली तर राज्य शासनाने 2006 मध्ये याबाबतचा एक शासन निर्णय घेतला होता व त्यानुसार या शिक्षकांचे वेतन निश्चित करण्यात आले होते.

याप्रमाणे विचार केला तर यामध्ये उच्च माध्यमिक स्तरांमध्ये पूर्ण अहर्ताधारक शिक्षकांसाठी 72 रुपये प्रति घड्याळी तास तसेच अपूर्ण अहर्ताधारक शिक्षकांसाठी 54 रुपये प्रति घड्याळी तास इतके वेतन दिले जात होते. तसेच माध्यमिक स्तरावरील शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना 54 रुपये प्रति घडाळीतास तर अप्रशिक्षित पदवीधर शिक्षकांसाठी 43 रुपये प्रति घड्याळी तास इतके नगण्य वेतन दिले जात होते.

याच २००६ च्या निर्णयानुसार आज सुद्धा राज्यामध्ये या शिक्षकांना वेतन दिले जात आहे. परंतु इतक्या कमी वेतनामध्ये शिक्षक कसे काय काम करणार याबद्दलचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांकडे शिक्षकांकडून मांडण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर आज राज्य शासनाने याबाबतचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतला आहे.

काय आहे नेमका शासन निर्णय?
याबाबतचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज राज्य सरकारने घेऊन या शिक्षकांना एक महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. जर आपण हा घेतलेला शासन निर्णय पाहिला तर यानुसार राज्यांमधील जे काही मान्यता प्राप्त माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आहेत. त्यामधून एखाद्या विषयासाठी अर्धवेळ शिक्षकांसाठी आवश्यक असलेला कार्यभार उपलब्ध होऊ शकत नसेल तर अशा विषयाच्या अध्यापनासाठी अहर्ता प्राप्त व्यक्तीची तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात येऊन त्यांना घड्याळी तासिकेनुसार मानधन देण्यात येते.

यासंबंधी 2006 च्या शासन निर्णयानुसार जे काही माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घडाळी तासिका तत्त्वावर नियुक्त शिक्षकांना जे काही मानधन देण्यात येत होते त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. यामध्ये नवीन शासन निर्णयानुसार खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घडाळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात आली असून यानुसार आता उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर घड्याळी तासिकेवर काम करणाऱ्या शिक्षकांना सुधारित दर आता प्रतितास 150 रुपये अशा पद्धतीने वाढ करण्यात आली असून

माध्यमिक स्तरासाठी घडाळी तासिकेवर काम करणाऱ्या शिक्षकांना या निर्णयानुसार आता प्रतितास 120 रुपये अशा सुधारित दरानुसार मानधन मिळणार आहे. परंतु यामध्ये आता घड्याळी तासिका तत्त्वावर नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्ण वेळ शिक्षकांप्रमाणे अहर्ताप्राप्त असणे गरजेचे आहे. अहर्ता पूर्ण नसलेल्या शिक्षकांची घड्याळी तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात येऊ नये अशासंबंधीचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय 1 डिसेंबर 2022 पासून अमलात आणण्यात येणार आहे. 067.19 dt.18.10.22 इतिवृत्त