
गोंदिया : जिल्हयात महाशिवरात्नी सणाच्या निमित्ताने प्रतापगड येथे दरवर्षी मोठय़ा प्रमाणात यात्नेचे आयोजन केले जाते. या दरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये व भाविकांना यात्नेचा आनंद मोकळेपणाने घेता यावा याकरिता व्हाईट आर्मी सज्ज झाली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कळविले.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत व्हाईट आर्मी यात्नेत सहभागी करु न घेण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, पोलिस उपअधीक्षक गृह सूरेश भंवर, वाहतूक नियंत्नण शाखेचे पोलिस निरीक्षक धूमाळ, संबंधित विभागाचे अधिकारी व व्हाईट आर्मीचे व्हॉलींटिअर्स उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी यात्नेदरम्यान स्वच्छता, शांतता व सूव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक प्रशासन यंत्नणेला मदत करण्याचे काम व्हाईट आर्मीद्वारे केले जाईल असे सांगितले.





