जात प्रमाणपत्र पडताळणीची ऑनलाईन कार्यशाळा 29 नोव्हेंबरला

0
16

 गोंदिया दि. 28: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया या कार्यालयाने गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राचार्य/संबंधित संपर्क अधिकारी यांची सभा माहे सप्टेंबर 2022 मध्ये घेण्यात येऊन जाती दावा पडताळणी संदर्भात विज्ञान शाखेच्या सत्र  2022-23 मधील इयत्ता 11 वी व 12 वी  मधील अनु.जाती. विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग व इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांची  यादी मागविण्यात आली होती. त्यानुसार काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी त्यांचे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची यादी समिती कार्यालय,गोंदिया स्तरावर सादर केली आहे. तथापि बहुतांश महाविद्यालयांकडून सदर माहिती कार्यालयात सादर करण्यात आलेली  नाही.

          सदर माहिती संकलित करुन वरिष्ठ कार्यालयास सादर करावयाची असल्याने जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राचार्य/ संबंधित संपर्क अधिकारी यांची दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी मंगळवारी ऑनलाईन सभा आयोजित करण्यात येत आहे. तरी महाविद्यालयांतील प्राचार्य संबंधित संपर्क अधिकारी यांनी ऑनलाईन सभेला सकाळी 10.30 उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समिती उपायुक्त राजेश पांडे यांनी केले आहे.