औष्णिक प्रकल्पाच्या जमिनीवर बँकेने गाडला ताब्याचा फलक

0
20

मोहाडी-तालुक्यातील रोहणा येथे भंडारा थर्मल पॉवर प्रकल्प उघडन्याच्या नावाखाली घेतलेल्या शेतजमिनीवर हैदराबाद येथील आयडीबीआय बँकेने ३१ ऑक्टोबर २0२२ ला ताब्याचा फलक गाडला आहे. त्यामुळे सदर जमिनीवर अतिक्रमण करुन शेती कसंनार्‍या शेतकर्‍यांमध्ये घबराट पसरली आहे.
सन २0११-२0१२ मध्ये आंध्रप्रदेश येथील तिरुपती बालाजी मंदीराच्या संचालकाने रोहणा येथील भंडारा थर्मल पॉवर प्रकल्प उघडायचा आहे. म्हणून शेतकर्‍यांना गावातील व बाहेरील दलालामार्फत पाट्र्या व भूलथापा देवून ८ लाख रुपये प्रती एकड प्रमाने ६५0 एकड जमीन खरेदी केली. त्यावेळी कुणी शेतकर्‍यांना जमीन देण्यास विरोध करू नयेत म्हणून परिसरातील गावातील सरपंचाना फिरायला नेले, तसेच गावातील ग्रा. पं. सदस्यांना नगदी स्वरूपात पैसे दिले. जमीन खरेदी करीत असतांना कुण्या प्रकल्पाच्या नावाने नाही तर एका व्यक्तीच्या नावाने जमीन घेतली जात होती. त्यावेळी याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. ८ लाख रुपये प्रती एकड भाव मिळत असल्याने शेतकरी पटापट आपली शेती विकत होते. त्या पैशातून शेतकर्‍यांनी दुचाकी, चारचाकी वाहने घेतली सिमेंटची घरे बांधली दुसर्‍या गावात शेती घेतली. आणि मौजमस्ती केली. मौजमस्ती मध्ये अनेक तरुण शेतकरी दारूच्या आहारी जावून मरण पावले. जमीन घेणारा कशासाठी जमीन घेतो, याकडे कुणीही लक्ष दिले नाही. ६५0 एकड. जमीन खरेदी झाल्यानंतर त्या व्यावसायिकाने पैसे संपल्याचा कांगावा करून जमीन खरेदी करने बंद केले. सदर जमिनीवर जमीन मालक कुठंलेही बांधकाम करीत नाही, म्हणून शेतकर्‍यांनी विकलेल्या आपआपल्या जमिनीवर अतिक्रमण करून शेती करने सुरू केले. जे शेतकरी बाहेरगावी राहतात त्या शेतकर्‍यांनी जमीन विकल्या वरही जमीन पैसा घेवुन ठेक्याने देत आहेत. काही दिवसानी शेतकरी जमीन कसत आहेत. म्हणून जमीन मालकानी जमिनीचे सपाटीकरण केले, तरीही शेतकर्‍यानी पुन्हा त्या जमिनीवर बांध तयार करून शेती कसने सुरू केले. यामध्ये जमीन विकणार्‍याचे चांगलेच भले झाले. मात्र, आपल्या गावात कारखाना येइल म्हणून आस लावुन असणार्‍या सुशिक्षित बेरोजगाराचे वाटोळे झाले आहे. थर्मल पॉवरच्या नावाखाली जमीन घेणार्‍या व्यापार्‍यांने कारखाना न उघडता त्या जमिनीवर कर्ज घेतले, आणि ते कर्ज मुदतीच्या आत फेडले नाही. म्हणून हैदराबाद येथील आयडीबीआय बँकेने त्या मालमत्तेवर दी.३१ ऑक्टोबर २0२२ ला सिक्युरिटयझेशन अँड एन्फोस्र्मेंट ऑफ सिक्युरिटी इंट्रेस्ट अँक्ट २00२ कायद्याचे कलम १३ (४) नियम (९) च्या अन्वये ठिकठिकाणी ताब्याचे फलक गाडले आहेत. त्यामुळे बँकेच्या जागेवर अतिक्रमण करून जमीन कसनार्‍या शेतकर्‍यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.