34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय राकाँच्या प्रत्येक कार्यात सहभाग घ्या-नरहरी झिरवाळ

राकाँच्या प्रत्येक कार्यात सहभाग घ्या-नरहरी झिरवाळ

0
19

blank

गडचिरोली-राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रत्येक उपक्रम नागरिकांच्या हिताचे असून पक्षाच्या कार्यात पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी हिरहिरिने सहभाग घ्यावे आणि नागपुरातील हिवाळी अधिवेशनात येत्या १९ डिसेंबर रोजी मोठय़ा संख्येने पक्षाच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांनी केले.
स्थानिक राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील प्रांगनात ‘वेध भविष्याचा-विचार राष्ट्रवादीचा’ उपक्रमात व कार्यकर्त्यांची आढवा बैठक आज ५ डिसेंबर रोजी आयोजित केली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथि म्हणून राज्याचे माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे, राकॉंचे निरीक्षक आमदार मनोहर चंद्रिकापूरे, माजी जि.प.अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, राकॉ महिला जिल्हाध्यक्ष शाहीन भाभी हकीम, जिल्हाध्यक्ष रविन्द्र वासेकर, माजी जीप सभापती नाना नाकाडे, रायुकॉंचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, शहर अध्यक्ष विजय गोरडवार, विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम, प्रदेश संघटन सचिव युनुस शेख, तालुकाध्यक्ष विवेक बाबनवाडे, अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, धानोरा तालुकाध्यक्ष सोपानदेव म्हशाखेत्री, शहराध्यक्ष लतीफ शेख वडसा, शहराध्यक्षा अमीन लालानी, जिल्हा सचिव संजय कोचे, सेवादल अध्यक्ष अमर खंडारे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष इंद्रपाल गेडाम, महीला शहर अध्यक्ष मिनल चिमुरकर, शहर कार्याध्यक्ष कपील बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शोषित, पीडित, वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी झटणारा पक्ष असून शेतकरी, कष्टकरी, वाढती महागाई, खाजगीकरणाच्या विरोधात उठून पेटन्यासाठी आणि महाराष्ट्र शासना पयर्ंत आवाज बुलंद करण्यासाठी येत्या १९ डिसेंबर रोजी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या खंबिर नेतृत्वाखाली ऐतिहासिक व भव्य मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चात अधिक संख्येने नागरिक सामील होण्याचे आवाहन केले. तसेच राज्याचे व देशाचे अन्यायकारक धोरण रोखणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविन्द्र वासेकर यांनी केले तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले उपस्थितांचे आभार लीलाधर भरडकर यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अल्पसंख्याक डॉ.एस.एन. पठाण, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल नंदनवार, गुलाम शेख, रायुकाँ उपाध्यक्ष प्रसाद पवार, रायुकाँ शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, रायुकॉं जिल्हा संघटक रंजीत रामटेके, कार्याध्यक्ष हीमांशू खरवडे, रायुकाँ जिल्हा सचिव संजय शिंगाडे, अ.भा.वि.प. कुणाल कोवे, विलास ठाकरे, रायुकाँ जिल्हा सचिव आकाश पगाडे, संकेत जनगणवार, मखमुर हुसेन शेख, राविकॉं उपाध्यक्ष सुमित मोतकुरवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, रायुकॉ तालुका अध्यक्ष स्वप्नील श्रीरामवार अहेरी, मोरेश्‍वर वासेकर, संजय बोदलकर, विद्यार्थी शहर अध्यक्ष रीतीक डोंगरे, संजय अलोने, श्रीनिवास मलेलवार, सा.न्या.विभाग सचिव संघटक हंसराज लांडगे, माजी रायुकॉ जिल्हाध्यक्ष कीशोर तलमले, महेश टीपले, रायुकाँ विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके, मिथुन नैताम, घनश्याम नैताम, संजय बोदलकर, जितु चलाख, कीशोर कापकर, दत्तु सोनटक्के, हेमंत भाकरे, बंडू मेर्शाम, नितीन कारेकार, रामदास रामटेके, अभय इंदूरकर यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

blank