
अर्जुनी मोर- नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यटन संकुल परिसरातील वन्यजीव विभागाच्या ग्रीन पार्क उपहारगृहाचे उदघाटन नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक पवन जेब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वन अधिकारी दादा राऊत, वन अधिकारी रोशन राठोड, सदाशिव अवगान, नवेगाव-नागझीरा व्याघ्र प्रकल्प वन अधिकारी सचिन डोंगरवार , नरेंद्र सावंत, लायन्स क्लबचे अध्यक्ष नितीन पुगलीया, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, मंजूताई बारसागडे, दुर्योधन मैदं, चिंतामण तरोणे, बुद्धे, परेश उजवणे, होमराज भेंडारकर, भामा चुर्हे उपस्थित होते.नवेगाव बांध पर्यटन संकुल परिसरातील ग्रीन पार्क उपहारगृह एस.के.ग्रुपला चालविण्याचे कंत्राट वन विभागाकडून देण्यात आले.गेल्या ४0 वर्षापासून भंगार अवस्थेत असलेल्या या ग्रीन पार्क उपहारगृहाच्या जीर्णोद्धाराचे काम अभियंता सुनील तरोणे यांनी केले.कमी वेळात मनुष्यबळाचा व वेळेचा वापर पर्यटकांना सुमार दर्जाच्या आहाराचा आनंद मिळावा याकरिता हे ग्रीन पार्क उपहारगृह सुरु करण्यात आले आहे. ग्रीन पार्क उपहारगृह उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्तविक सुनील तरोणे यांनी केले.
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक पवन जेब यांनी या पर्यटन संकुल परिसराचे येत्या एक-दोन वर्षात पर्यटकांना हव्या असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.संकुल परिसरात प्लास्टिक पिशव्यांचे निर्मूलन करून संपूर्ण संकुल परिसर स्वच्छ करून संजय कुटीपयर्ंत पर्यटकांना हव्या असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी व काही गोष्टीवर आळा घालण्यासाठी कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.





