तालुका कृषी अधिकार्‍यासह लिपीक एसीबीच्या जाळय़ात

0
41

गडचिरोली- राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कम्बाईन हॉर्वेस्टर खरेदी केल्याने सबसिडीची रक्कम खात्यात जमा केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडून ४0 हजार रूपांची लाच मागणार्‍या तालुका कृषी अधिकारी व कृषी कार्यालयातील वरिष्ठ लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७ डिसेंबर रोजी सायंकाळी रंगेहात अटक केली.
संदीप अशोकराव वैद्य (३३) असे लाचखोर लिपिकाचे नाव असून तो जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात लेखा विभागात वरिष्ठ लिपिक आहे. लाचखोर तक्रारदाराकडून ४0 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पडकला गेला. त्यातील २0 हजार रूपयांचा वाटप तालुका कृषी अधिकारी तथा प्रभारी उपविभागीय कृषी प्रदिप वाहाने (४९) यांना रंगेहात पकडण्यात आले.
तक्रारदारास राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत कम्बाईन हॉर्वेस्टर खरेदी केल्याने सबसिडीची रक्कम एकूण ११ लाख रूपये बॅंक खात्यात जमा केल्याचा मोबदला म्हणून आरोपी संदीप वैद्य याने ५0 हजार लाचेची मागणी केली. तडजोडीअंत स्वत: व लाचखोर आरोपी प्रदीप वाहने याचेसाठी ४0 हजार रूपये मागणी केली. परंतु तक्रारदारास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करून ७ डिसेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालया समोरील एका चहाटपरीवर तक्रारदाराकडून ४0 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.