30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ पुणे जिल्ह्यातील भटकलेल्या पिडीत महिलेला गोंदिया वन स्टॉप सेंटरनी पोहचविले घरी

पुणे जिल्ह्यातील भटकलेल्या पिडीत महिलेला गोंदिया वन स्टॉप सेंटरनी पोहचविले घरी

0
24

blank

गोंदिया दि.28 :14 डिसेंबर 2022 रोजी गोंदिया शहरातील एका रस्त्याच्या बाजुला बेघर आणि आजारी अवस्थेत एक पिडीत महिला ही सावली निवारा केंद्र सामाजिक संस्था गोंदिया यांना आढळली. सावली निवारा केंद्र येथील कर्मचाऱ्यांनी कोणतीही वेळ न घालवता पिडीत महिलेला स्व.कमलादेवी शिक्षण संस्था आमगाव द्वारा संचालित महिला व बालविकास अंतर्गत वन स्टॉप सेंटर कार्यालयात दाखल केले. वन स्टॉप सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी महिलेची तब्बल 5 दिवस विचारपुस करुन महिलेचा नाव माहित करुन घेतले. वन स्टॉप सेंटरचे केंद्र प्रशासक समिना खान यांच्या नेतृत्वात वन स्टॉप सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी महिलेच्या अवस्थेला गंभीरपणे घेत पिडीत महिलेच्या घराच्या पत्त्याचा शोध लावला.

          केंद्र प्रशासक समिना खान यांनी पिडीतेच्या परिवाराशी संपर्क केले असता असे कळले की, पिडीतेचा परिवार हा पुणे जिल्हा येथील एका गावी राहतो. पिडीतेच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती खुप बिकट असल्याने परिवारातील सदस्य तिला घेऊन जाण्यासाठी सुध्दा सक्षम नाही. शेवटी महिलेला तिच्या घरी पोहचविण्यासाठी वन स्टॉप सेंटरने पुढाकार घेत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे तसेच शहरी पोलीस ठाणे गोंदिया यांच्या मदतीने वन स्टॉप सेंटरचे कर्मचारी तसेच पोलिसांच्या सुरक्षेसहीत महिलेला दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी तिच्या परिवाराच्या स्वाधीन करण्यात आले. पिडीत महिलेला तिचा परिवार पुन्हा मिळाल्याने महिलेने व तिच्या परिवारातील सदस्यांनी वन स्टॉप सेंटर गोंदिया तसेच गोंदिया पोलीस प्रशासनाचे आभार मानले. वन स्टॉप सेंटर ही योजना सखी केंद्राच्या नावाने गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालय येथे 24 तास पिडीत महिलांसाठी सुरु आहे.

blank