आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले* यांची जयंती उत्सावात साजरी

0
42

गोरेगांव- ३ जानेवारी– तालुका तील मोहाडी येतील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे आज दिनांक ३ जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष मदनलाल बघेले तर प्रमुख अतिथि ग्रांम पंचायत मोहाडी चे नवनिर्वाचित सरंपच नरेंद्र कुमार चौरागडे, संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय डि चौरागडे, सदस्य जे जे पटले, हिरालाल महाजन देवदास चेचाने,, सेवानिवृत्त शिक्षक वाय एफ पटले सर, सेवानिवृत्त शिक्षक चैतराम डोहले, दुलीचंद शोरले, भैयालाल चौधरी, परमानंद तिरेले, मुकेश येरखडे, दुर्गेश चेचाने, कुल्लु वरखडे,आशा चेचाने आदी उपस्थित होते.
यावेळी ग्रांम पंचायत सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी मार्गदर्शनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला सातारा जिल्हातील नायगांव येथे झाला सावित्रीबाई फुले यांचे आई चे नाव सत्यवती नेवसे,वडील खंडोजी नेवसे पाटिल,पती जोतीराव फुले
सावित्रीबाई जोतीराव फुले ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाज सुधारक होत्या फुले यांनी आशिया खंडातील पहिली शाळा सुरू केली सावित्रीबाई यांनी जोतिबाच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला असे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन व आभार सुभाष चौरागडे यांनी मानले.