मॉडेल कॉन्व्हेंट एंड सायन्स ज्यू. कॉलेज मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिवस म्हणुन उत्साहात साजरी

0
10

गोरेगांव :- स्थानीय *मॉडेल कॉन्व्हेंट एंड सायन्स ज्यू. कॉलेज मध्ये 3 जाने. हा दिवस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिवस म्हणुन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक प्रा. आर. डी. कटरे हे अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते तसेच शाळेचे प्रशासकीय अधिकारी श्री सी. बी. पटले, प्राचार्य सौ. सी. पी. मेश्राम, पर्यवेक्षक कु. एस. डी. चीचामे हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे, गीत अशा प्रकारचे रंगारंग कार्यक्रम प्रस्तुत केले. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन लाभलेले श्री तुलसी शिक्षण संस्था गोरेगांव चे सचिव प्रा. आर. डी. कटरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला यशस्वीरीत्या पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. महिला शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व महिला शिक्षकांना मंचकावर बोलावून त्यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वर्ग 9 वी चे विद्यार्थी कु.वैभवी ठाकूर, कु. खुशी पुंजे यांनी केले तसेच आभार कु. वैष्णवी रहांगडाले हिने मानले.