
: अरततोंडी येथे शाखेचे उदघाटन
अर्जुनी मोरगाव-समाजातील विषमता नष्ट करून समानता प्रस्थापित करण्याचे काम समता सैनिक दल करते. अन्याय,अत्याचाराविरोधात लढा देण्याचे काम दलाच्या माध्यमातून केले जाते.हे सामजिक संघटन नाही तर ही एक कार्यशाळा आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन दलाच्या वाटचालीत योगदान द्यावे. असे मत मिथुन मेश्राम यांनी समता सैनिक दल शाखा अरततोंडी/पर. येथे शाखा उदघाटन कार्यक्रमात व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळ्यांना माल्यार्पण व बुद्ध वंदनेने झाली.कार्यक्रमाचे उघाटक श्रीकांत घाटबांधे जि प. सदस्य, गोंदिया,कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेखा टेंभुर्णे असी. जी. ओ. सी. गोंदिया, हिरकचंद टेंभुर्णे, रामुजी कुंभरे सयपंच, ज्ञानेश्वर गेडाम उपसरपंच, गिरधारी रक्षा पो.पाटील, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की, समाजाच्या हितासाठी लढण्याचा काम समता सैनिक दल करत असतो. जुड़ो कराटे ,लाठी काठी, बौद्धिक, शौक्षणिक, शारिरीक प्रशिक्षण देण्याचा काम समता सैनिक दल करत असतो. युवकांनी मोठ्या प्रमाणात समता सैनिक दलात सामील व्हावे असे आवाहन मिथुन मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रितम रामटेके यांनी केले प्रास्ताविक नितीन मेश्राम यांनी केले. तर आभार सुरज रामटेके यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता सैनिक दल शाखा अरततोंडी परसटोला यांनी परीश्रम घेतले.





