मुंबई, दि. 10 : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर – 2022’ या स्पर्धेचा निकाल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घोषित केला आहे.
लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे दिनांक 26 सप्
या स्पर्धेत -एकल गटांतर्गत स्नेहा मेश्राम (पुणे) यांना प्रथम प्रिया माकोडे (यवतमाळ) यांना द्वितीय पारितोषिक, बाळू बनसोडे (सोलापूर) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच, समूहांतर्गत ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित शाहीर नानाभाऊ परिहार आणि संच (जालना) यांना प्रथम शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील, खानदेश लोकरंग फाऊंडेशन, नगरदेवळा (जळगाव) यां
त्याचप्रमाणे, एकल आणि समूह या दोन्ही गटांतर्गंत एकूण 20 उत्तेजनार्थ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :
अ. एकल गट – उत्तेजनार्थ : 1. श्रीकांत देवगोंडा मेडशिंगे (कोल्हापूर), 2. बालाजी महादेव जाधव (रायगड), 3. विनोद विद्यागर (मुंबई उपनगर), 4. अनंता अर्जुन मिसाळ (बुलढाणा), 5. शंकर नागनाथ कांबळे (सोलापूर), 6. महादेव तुकाराम भालेराव (बीड), 7. शहाजान सरदार मुकेरी (नाशिक), 8. धनश्री दिनेश जोशी (जळगाव), 9. जयश्री उदय पेंडसे (सांगली), 10. शिल्पा निनाद नातू (ठाणे).
आ. समूह गट – उत्तेजनार्थ : 1.
एकल गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे 7 हजार , 5 हजार आणि 3 हजार रुपये ; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त 10 विजेत्यांना प्रत्येकी 500 रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.
समूह गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे 21 हजार रुपये, 11 हजार रुपये आणि 5 हजार रुपये; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त दहा विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.
या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम संगीत विशारद पुंडलिक कोल्हटकर आणि नृत्य कलावंत डॉ.सान्वी जेठवाणी यांनी पाहिले.





