तिरोडा : शिक्षणाला सर्वाधिक महत्व आहे. सर्वांचे जीवन शिक्षणाच्या माध्यमातूनच घडते. तुम्ही एक पोळी कमी खा, पण आपल्या मुलांना शिकवा. शिक्षणावर जास्तीत जास्त भर द्या. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आणि विद्यार्थी हे देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत, असे प्रतिपादन कवलेवाडा क्षेत्राचे जिप सदस्य किरण पारधी यांनी केले.
तालुक्यातील घोगरा (भीम नगर) येथे मंगळवार, 10 जानेवारी 2022 रोजी शालेय स्नेहसंमेलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात उद्घाटक म्हणून जि.प. सदस्य किरण पारधी मार्गदर्शन करताना बोलत होते.
अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य वनिता भांडारकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून घोगराचे सरपंच प्रीती भांडारकर, माजी जिप सदस्य मनोज डोंगरे, राजेंद्र शेंडे, खुशबू जगणे, मुख्याध्यापक जे.एम. सर, राजेंद्र शेंडे, अंगणवाडी सेविका बोरकर आदी उपस्थित होते. संचालन खुशबू जगणे यांनी केले तर आभार जे.एम. पटले यांनी मानले.





