23.5 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home विदर्भ अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील वडेगाव/बंध्या येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील वडेगाव/बंध्या येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

0
61

अर्जुनी/मोरगाव- तालुक्यातील गोठणगाव वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वडेगाव/बंध्या येथील महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज सकाळी 10 ते 11 वाजताच्या सुमारास घडली.मृत महिलेचे नाव आशा संजय ताळाम वय 35 रा.वडेगाव/बंध्या असे आहे.आशा ताळाम हिला दोन मुल असून दोघेही लहान आहेत.पती संजय राजाराम ताळाम हे रोजगारासाठी कर्नाटक राज्यात गेले आहे.
सविस्तर असे की आशा ताळाम या इतर सहा सात महिलासोंबत स्वयंपाकाच्या इंधनाकरिता वडेगाव/बंध्या ते वाळव्ही रस्त्यावर असलेल्या जंगलात सरपण गोळा करण्याकरिता गेल्या होत्या.सरपण गोळा करीत असतांना झुडपात दबा धरुन बसलेल्या वाघाने मागुन हल्ला चढवत आशाला ठार केले.घरच्यांनी आशा घरी परतली नाही म्हणून जंगलात शोध घेतला असता आशा मृताअवस्थेत आढळली. वाघाच्या हल्याची माहिती गावात मिळताच गावातील नागरिक घटनास्थळाकडे धाव घेत गावकऱ्यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली.वनविभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी पोचून महिलेचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीकरीता पाठवले.तसेच आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनीही मृतकाच्या घरी जाऊन कुटुबियांचे सांत्वन केले.यावेळी रतीराम राणे,उध्दव मेहंदळे,योगेश नाकाडे,श्रीकांत घाटबांधे,प्रदिप मस्के,राकेश लंजे आदी उपस्थित होते.