24.7 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home शैक्षणिक एमपीएससीच्या नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

एमपीएससीच्या नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

0
17

नागपूर,दि.13ः-  एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात यावा अशी मागणी करत आज शुक्रवारी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.स्टुडंट राइट असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कोरारम यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आमदार अभिजित वंजारी यानी उपस्थित होत आंदोलनाला पाठिंबा दिला.एमपीएससी मंडळाने नवीन वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम लागू केला. अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि कित्येक वर्षांची मेहनत वाया जाईल. त्यांना पुन्हा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात यावा अशी मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.एमपीएससीच्या परीक्षांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून घोटाळे होत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. यामुळे एमपीएससी विरोधात आंदोलन करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत आहेत.