स्व. चुन्नीलाल भाऊ ठाकूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेला प्रोजेक्टर भेट

0
59

गोरेगांव-माजी खासदार व सहकार महर्षी स्व.चुन्नीलाल भाऊ ठाकूर यांच्या तृतीय पुण्यतिथीचे औचित्य साधत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सटवा येथे शैक्षणिक कामासाठी प्रोजेक्टर भेट देण्यात आले.
गावातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषद शाळेत प्रोजेक्टर आवश्यक असल्याचे बाब त्यांचे पुत्र देवकांत ठाकूर यांच्या लक्षात
शाळेचे मुख्याध्यापक श्री बिजेवार यांनी आणून दिली. त्यामुळे आपण शाळेला प्रोजेक्टर भेट देण्याचे आश्वासन त्यांच्याकडून शाळेला देण्यात आले होते. आज मकर संक्रांती निमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमात सदर साहित्य शाळेला भेट देण्यात आले. याप्रसंगी को ऑप. बँकेचे देवकांत ठाकूर, उपसरपंच विनोद पारधी, गावातील प्रतिष्ठित नागरिक भागचंद्र रहांगडाले, सेवानिवृत्त शिक्षक चंद्रशेखरजी कटरे, येळेजी आयुष कॅम्पुटर गोरेगाव, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक एन.सी.बिजेवार, रहांगडाले सर,बिसेन सर,हरिणखेडे सर,कटरे मैडम,पुरी मैडम, आशाताई शरणागत उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना देवकांत ठाकूर व भागचंद्र रहांगडाले यांनी शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचनालय तयार करण्यासाठी तसेच शाळेला शैक्षणिक साहित्यासाठी मदत करण्यास सदैव तत्पर असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रहांगडाले  यांनी तर आभारप्रदर्शन हरिणखेडे  यांनी केले.